नाशिक

नस्तनपूरमध्ये २५ वर्षांनंतर ऐतिहासिक ''त्रिवेणी संगम'' सुवर्णयोग; शनि जन्मोत्सवासाठी लाखो भाविकांची मांदियाळी

CD
पान तीन ॲंकर ------------------- 10698 नांदगाव : शनिदेव मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली शनी देवाची पुरातन वालुकामय मूर्ती. नस्तनपूर शनिपीठावर २५ वर्षांनंतर ''त्रिवेणी संगम'' आज लाखो भाविक दर्शन घेण्याची शक्यता सकाळ वृत्तसेवा नांदगाव, ता. १५ : आध्यात्मिक क्षेत्रात विशेष महत्त्व असलेले आणि प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले देशातील प्रमुख शनिपीठ म्हणजेच नस्तनपूर. शनिवारी (ता.१५) या तीर्थक्षेत्री तब्बल २५ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा ''त्रिवेणी संगम'' सुवर्णयोग जुळून येत आहे. या ऐतिहासिक पर्वणीसाठी नस्तनपूर (ता. नांदगाव) पंचक्रोशीसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. सोहळ्यासाठी मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त, माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि महाप्रसादाची व्यवस्था युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने परिसरातील तरुणांना या पुण्य पर्वकाळात शिस्त राखण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐतिहासिक योगाचे साक्षीदार होण्यासाठी आणि शनिदेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन येथील संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. यांनी केले. काय आहे हा ''त्रिवेणी संगम'' सुवर्णयोग? यावर्षी तीन मोठे सोहळे एकाच दिवशी आल्याने याला आध्यात्मिक दृष्ट्या ''दुग्धशर्करा योग'' मानले जात आहे. प्रथम श्री शनी महाराज जन्मोत्सव: सूर्यपुत्र शनिदेवाचा प्रकट दिन मोठ्या थाटात साजरा होणार आहे. त्यानंतर अखंड चाललेल्या गाथा पारायणाची पूर्णाहुती होऊन महाप्रसाद वितरण केले जाईल. यासोबत नस्तनपूरची पारंपरिक यात्रा देखील याच दिवशी होत आहे. रामराज्यकालीन आख्यायिका नस्तनपूर स्थानाचे महत्त्व पुराणातही अधोरेखित करण्यात आले आहे. वनवासात असताना प्रभू श्री रामचंद्र यांनी याच ठिकाणी शनिदेवाची विशेष आराधना केली होती, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या क्षेत्राला आध्यात्मिक ऊर्जा केंद्र'' मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT