क्रूझरला वाचविताना बस नाल्यात
नांदगावला अपघातात पाच जखमी
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता.२४ : नांदगाव - चाळीसगाव मार्गावरील पिंपरखेड टोल नाक्याजवळ सोमवारी मानव विकास योजनेअंतर्गत धावणाऱ्या एस.टी. बसचा अपघात झाला.समोरून येणाऱ्या प्रवासी क्रूझर वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उतरल्याने चालक, वाहक आणि प्रवाशांसह एकूण पाच जण जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मानव विकास योजनेअंतर्गत सुरू असलेली बस ( एम.एच.०६ एस.८६३५ ) नांदगावहून न्यायडोंगरीकडे जात असतांना पिंपरखेड टोल नाक्याच्या अलीकडे समोरून प्रवाशांनी भरलेली खासगी क्रूझर गाडी आली. या प्रवासी क्रुझरला वाचवितांना बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उतरली. या अपघातात बसचा चालक स्टिअरिंगमध्ये अडकून जखमी झाला.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत चालकाला सुरक्षित बाहेर काढले.त्याच्या पायाला दुखापत झाली असून चालक केशव भगतसिंह परदेशी, वाहक अनिल जगन्नाथ आहेर यांचेसह शहादु अंबू मोरे, ताराबाई शहादु मोरे, सदू कल्याण चव्हाण हे तिघे प्रवासी जखमी झाले आहेत.सर्व जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे, ज्या क्रूझर वाहनाला वाचविताना हा अपघात घडला त्या वाहनामध्ये १४ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक हेमंत पगार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक वाहतूक नियंत्रक सतीश ईप्पर तसेच कार्यशाळा अधीक्षक श्रीमती सोनल खैरनार यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.