नांदगावातील विकासकामांना गती
विलंब झाल्यास ठेकेदारांवर कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २५ : शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची गती वाढविण्यासाठी आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान व नगराध्यक्ष सागर हिरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करीत, कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला.
शहरातील विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी झालेल्या पाहणीत फरहान खान, नगराध्यक्ष सागर हिरे व नगरसेवकांनी कामांची पाहणी केली. अनेक ठिकाणी कामांचा वेग मंदावल्याचे निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांना कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी दिवंगत गोपीनाथराव मुंडे स्मारक, शिवसृष्टी, जुना पशुवैद्यकीय दवाखाना, गांधी चौकातील मोठा पूल, महात्मा फुले चौक ते महात्मा गांधी चौक रस्ता, भूमिगत गटार योजना तसेच शिवस्फूर्ती येथील कमानीच्या कामाचा आढावा घेतला. प्रत्येक कामासाठी निश्चित अंतिम मुदत देण्यात आली असून, त्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित एजन्सी व ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, प्रकाश शिंदे, नगरसेवक दीपक पांडव, सईद शेख, नगरपालिकेचे अधिकारी व संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
नांदगाव : विकासकामांची पाहणी करताना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान,नगराध्यक्ष सागर हिरे व खातेप्रमुख कंत्राटदार नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.