फोटोः 10793
नांदगाव : येथे सौरभ विसपुते यांच्या घरात चोरट्यांनी फोडलेले कपाट.
---
नांदगावला घरफोडीत
अडीच लाखाचा एवज लंपास
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २६ : शहरातील हनुमाननगर भागात गुरुवारी (ता. २५) दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून २ लाख ४० हजार रुपयांच्या रोकडसह चांदीचे दागिने लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, रहिवासी धास्तावले आहेत.
अशोक विसपुते व सौरभ विसपुते यांच्या घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधत दुपारी दीड ते दोनच्या सुमारास काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गोदरेज कपाटाचे लॉकर फोडून ऐवज लंपास केला. चोरट्यांनी यापूर्वी निवृत्त शिक्षक नंदू पाटील यांच्याही घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. घरमालक सौरभ विसपुते घरी परतत असताना त्यांनी दुचाकीवरून पळून जाणाऱ्या संशयितांचा पाठलाग केला, मात्र वाहतुकीच्या वर्दळीचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यात तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू ठेवले होते. हनुमाननगर भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.