नाशिक

नांदगाव मंडल भाजपाची बैठक; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

CD
नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची भाजपची मागणी सकाळ वृत्तसेवा नांदगाव, ता. १३ : नांदगाव मंडल भाजपची बैठक मंडल अध्यक्ष संजय सानप यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली. माजी तालुकाध्यक्ष तथा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सजन तात्या कवडे उपस्थित होते. बैठकीत ‘सेवा संकल्प अभियान’, एसआयआर प्रक्रिया आणि संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. मंडलातील विविध स्तरांवर सामाजिक व सेवाभावी उपक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. एसआयआर प्रक्रियेत मतदार यादीतील वगळलेली नावे, चुकीची माहिती व अन्य त्रुटी दुरुस्त करून घेण्यासाठी मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. विविध मोर्चा व आघाड्यांच्या कार्यकारिण्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मदतीची मागणी तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचा मुद्दा पंचायत राजचे तालुकाध्यक्ष अरुण पवार यांनी मांडला. नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्याचे ठरले. सचिन तात्या कवडे यांनी नांदगाव तालुक्याचा विकासकामांसाठी जिल्हा नियोजन आराखड्यात समावेश करण्याची मागणी केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्याची सूचना करण्यात आली. बैठकीस भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT