पान दोन ॲंकर
--------------
11065
नांदगाव : ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना मविप्र संचालक अमित बोरसे.
नावीन्यपूर्ण संशोधनातूनच समाजाचा शाश्वत विकास
अमित बोरसे : नांदगावला ''अविष्कार'' स्पर्धेत ५१ हून अधिक प्रकल्पांचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १८ : आपण आजूबाजूला मानवी जीवन जगत असताना अनेक अडचणी व समस्या अनुभवत असतो. या समस्यांकडे केवळ अडचण म्हणून न पाहता, त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधणे म्हणजेच संशोधनाची खरी सुरुवात होय. विद्यार्थ्यांनी परिसरातील समस्यांचे निरीक्षण करून शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा आणि त्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असे प्रतिपादन मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''अविष्कार'' संशोधन स्पर्धा २०२६-२७ च्या महाविद्यालयीन फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
तसेच तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांच्या समन्वयातून समाजाचा शाश्वत विकास साधला जावा, असे मनोगत प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी व्यासपीठावर रमेश अण्णा बोरसे, सुनील बोरसे, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, एम. बी. आटोळे, डॉ. के. आर. खंदारे, डॉ. आर. डी. झनकर व डॉ. पी. टी. निकम उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डी. वाय. तुगार, श्रीमती एस. एम. अवारे, प्रा. भीमराज गायकवाड, प्रा. एस. जे. कर्वे, प्रा. ए. एम. लवाटे, प्रा. बी. पी. गोरे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.प्रास्ताविक डॉ. एम. पी. मेश्राम यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. व्ही. ए. गागरे-पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. एस. एस. शेंडगे यांनी मानले.
--------
संशोधनाची प्रक्रिया अधिक महत्त्वाची : डॉ. तिदार
स्पर्धेचे परीक्षक व प्रमुख पाहुणे डॉ. ए. एल. तिदार यांनी तब्बल ५१ हून अधिक संशोधन प्रकल्प व मॉडेल्सचे परीक्षण केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, गुणांपेक्षा संशोधन महत्त्वाचे आहे आणि संशोधनापेक्षाही त्याची प्रक्रिया अधिक महत्त्वाची आहे. संशोधन म्हणजे केवळ अंतिम निष्कर्ष नव्हे, तर सत्याचा शोध घेण्याची सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.