NDM26B01307
नांदूरमध्यमेश्वर ः महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना येथील ग्रामस्थ.
३०-२
वीजपुरवठा सुरळीत करा,
अन्यथा कार्यालयाला टाळे
नांदूरमध्यमेश्वर येथील ग्रामस्थांचा इशारा
नांदुरमध्यमेश्वर, ता.१७ ः उपलब्ध पावसावर पिके जगविण्याची धडपड सुरू असताना महावितरणतर्फे सतत वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यातच बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीजवितरण कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नांदूरमध्यमेश्वर ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता शुक्लेश्वर घोटेकर यांना दिला.
---------------
याबाबत ग्रामस्थांनी सविस्तर निवेदन दिले आहे. त्यानुसार सध्या गणेशोत्सवाचे दिवस असून सायंकाळी ऐन आरतीच्या वेळेस वीज गायब होते. शिवारात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात संचार सुरू असून आत्तापर्यंत बिबट्याने शेळ्या, मेंढ्या, कुत्रे यांचा फडशा पाडत अनेकाना दर्शन दिले आहे. भारनियमनाव्यतिरिक्तही वीज गायब होत असून वीज बिल मात्र वेळचेवेळी भरमसाठ येते. शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, विशेषता रात्री भारनियमन करण्यात येऊ नये, आम्ही वीज वितरण कंपनीला आठ दिवसाची मुदत देत असून त्यानंतरही स्थिती कायम राहिल्यास वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
------------------
राष्ट्रवादीचे नेते हरिश्चंद्र भवर, आनंद जाधव, सोपान वाघ, सतिश शिंदे , दिपक ईकडे , सुनिल ईकडे , संजय उबाळे ,राजेंद्र. शेळके ,प्रभाकर चव्हाणके ,राजेंद्र नाईकवाडे,जालिंदर गाजरे, दत्ता नाईकवाडे,मयुर अनारसे ,देविदास उबाळे,मनोज वाघ, दत्ता ईकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.