प्रा. वासील अन्सारी : NGL26B04048
---------
प्रा. वासिल अन्सारी यांच्या
उपकरणाला डिझाइन पेटंट
निमगूळ, ता. ९ : दोंडाईचा येथील दादासाहेब रावल फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. वासिल अहमद कफिल अन्सारी यांनी संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘ऑटोमॅटिक रायथिंग रिस्पॉन्स काउंटर’ या अभिनव उपकरणाच्या डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइन नोंदणी प्राप्त झाली आहे.
फार्माकोलॉजी विषयातील प्रयोगांमध्ये चाचणी प्रक्रियेसाठी विकसित केलेले हे उपकरण औषध उद्योगातील गुणवत्ता नियंत्रण, तसेच संशोधन कार्यासाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. प्रयोगशाळेतील प्रक्रिया अधिक सुलभ, अचूक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. संशोधनातील या यशासोबतच प्रा. वासिल अन्सारी यांनी ‘अल्टिमेट प्रोमेट्रिक सक्सेस फॉर हेल्थकेअर प्रोफेशनल्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स’ या पुस्तकाचीही निर्मिती केली आहे. सरकारसाहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल, संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्रसिंग जमादार, सचिव सी. एन. राजपूत, सचिव (सामान्य प्रशासन) ललितसिंग गिरासे, सहसचिव आर. टी. गिरासे, सहसचिव डी. एन. जाधव, प्राचार्य डॉ. घनश्याम चव्हाण यांनी प्रा. अन्सारी यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.