नाशिक

पद्मश्री चैत्राम पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

CD
दोंडाईचात २० सप्टेंबरला पृथ्वी सन्मान सोहळा निमगूळ, ता. १२ : दोंडाईचा येथील पृथ्वी मोलाची फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, ग्रामविकास आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘पृथ्वी सन्मान २०२६’ या पुरस्कार सोहळ्याचे २० सप्टेंबरला सायंकाळी चारला हस्ती प्री प्रायमरी स्कूल काराणी भवन येथे होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री चैत्राम पवार होते. प्रमुख वक्ते केदारनाथजी कवडीवाले मार्गदर्शन करणार आहेत. यावर्षीचा ‘बिल्व पत्र पुरस्कार’ जलसंधारण, पर्यावरण संवर्धन व ग्रामविकासाच्या क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या ग्रामविकास समिती, अक्कलकोस (ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांना प्रदान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील एव्हरेस्ट वीर चंद्रकलाजी गावित (मोहगाव, जि. धुळे), शाश्वत विषमुक्त शेती कृष्णाजी कडुबा झलवार (सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), वन्यजीव संरक्षण व वन जागृती गोल्डन अर्थ बायोडायव्हर्सिटी (धुळे गो-संवर्धन व प्रबोधन, विश्वमाता गोशाळा (सुराय, ता. शिंदखेडा), सर्प संवर्धन व संरक्षण- दीपक संजय धनगर (दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पृथ्वी मोलाची फाउंडेशनचे संचालक निहारिका बेलवलकर व पराग पंचभाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT