नाशिक

रावल संघाची वार्षिक सभा

CD
(पान ४ ला ॲंकर) NGL26B04060 दोंडाईचा : येथील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिष्यवृत्ती वाटप करताना बापूसाहेब रावल, रघुवीर बागल, महेंद्र पाटील, नारायण पाटील व संघाचे पदाधिकारी. ------------ दूध संकलन वाढल्यास संघाचा कारभार बळकट बापूसाहेब रावल : दूध उत्पादक सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. १९ : दूध उत्पादक सभासदांच्या पाल्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी १२ लाख रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. ही योजना आजही सुरू आहे. संघाकडे सध्या दूध संकलन कमी आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी संघाला अधिकाधिक दूध पाठवावे. दूध संकलन वाढल्यास संघाचा कारभार बळकट होण्यासोबतच दूध उत्पादकांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल. संघाला दूध देणाऱ्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभही पुढे मिळत राहील, असे प्रतिपादन माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी केले. दोंडाईचा येथील दादासाहेब रावल शिंदखेडा तालुका कृषिपूरक उद्योग सहकारी संघाची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या आवारात खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी दादासाहेब रावल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दूध उत्पादकांनी संघाला अधिकाधिक दूध पुरवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सभेला संघाचे अध्यक्ष रघुवीर बागल, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक आनंदा पाटील, किशोर पाटील, नारायण पाटील, गुलाबराव पाटील, दिनेश चोळके, ललित गिरासे, दिलीप धनगर, रवींद्र भील, सतीश पवार आदी उपस्थित होते. प्रभारी व्यवस्थापक दीपक शिसोदे यांनी संचालक मंडळाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच व्यापारी पत्रक सभेसमोर वाचून दाखविले. सभासदांनी त्यास मंजुरी दिली. यावेळी तालुक्यातील दूध उत्पादक सभासदांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. प्रभारी व्यवस्थापक दीपक नारायण शिसोदे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT