नाशिक

बागल संस्थेची वार्षिक सभा

CD
NGL26B04062 निमगूळ (ता. शिंदखेडा) : बागल संस्थेच्या सभेत इतिवृत्ताचे वाचन करतांना सचिव रोहित बागल व संचालक मंडळ, सभासद. --------- बागल पतसंस्थेला २२ लाखांचा नफा निमगूळ येथे ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. १७ : येथील बापूसाहेब पी. झेड. बागल पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या प्रांगणात साईबाबा मंदिराजवळ उत्साहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमर बागल होते. संस्थेला मागील आर्थिक वर्षात २२ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. सभेच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक बापूसाहेब पितांबर बागल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे सचिव रोहित बागल यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. तसेच, चालू वर्षाची आर्थिक पत्रके सभेसमोर सादर करण्यात आली. त्यास सभासदांनी मंजुरी दिली. सुधारित आदर्श उपविधी तसेच संस्थेच्या इमारतीच्या वाढीव बांधकामाबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष आनंदराव बागल म्हणाले, ३६ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात लावलेल्या संस्थेच्या रोपट्याचे सभासदांच्या सहकार्यामुळे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सभासदांचा विश्वास आणि संस्थेचे ध्येय यांची सांगड घालत संस्थेला आणखी उंचीवर नेण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना गेल्या ३६ वर्षांपासून कर्जपुरवठा करणारी संस्था म्हणून बागल पतसंस्थेची ओळख आहे. सभासदांसाठी समर्थ योजना, ओम समर्थ योजना, लक्ष्मी ठेव योजना यांसह विविध ठेव व बचत योजना सुरू आहेत. तसेच, गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवीसह विविध योजना उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष आनंदराव बागल, मोतीलाल बागल, अशोक पाटील, रामकृष्ण बागल, विजय बागल, हर्षवर्धन बागल, बापू सोनवणे, अंजनाबाई बागल, प्रमिलाबाई बागल आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव रोहित बागल यांच्या मार्गदर्शनाखाली भटू पाटील, अजय पाटील, वसंतराव पाटील, केतन बागल, वैभव बागल, प्रशांत शिंदे आदी सहकारी काम पाहत आहेत. हर्षवर्धन बागल यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रोहित बागल यांनी आभार मानले. -------- संस्थेची सांपत्तिक स्थिती सभासद संख्या : १४६५ भागभांडवल : ९० लाख वसूल भागभांडवल : ८० लाख निधी व इतर निधी : १ कोटी ४८ लाख ठेवी : ५ कोटी १२ लाख संस्था ठेव गुंतवणूक मालमत्ता : २ कोटी ५४ लाख नफा : २२ लाख ऑडिट वर्ग : अ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

SCROLL FOR NEXT