नाशिक

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शितल ढोमसे अजिंक्य

CD
NPH26B08330 ः शीतल ढोमसे ३०-२ वयाच्या चाळीसाव्या वर्षी पॉवरलिफ्टिंगमध्ये अजिंक्य ---------------- निफाडच्या शीतल ढोमसेंची कामगिरी -------- सकाळ वृत्तसेवा निफाड, ता. १४ ः युनायटेड पॉवरलिफ्टिंग असोसिएशनतर्फे नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये येथील शीतल ढोमसे यांनी अजिंक्यपद पटकावले. शीतल यांना पॉवर लिफ्टिंगचे सुवर्णपदक पल्लवी गोस्वामी, बेंच प्रेसचे सुवर्णपदक उदय वाल्मिकी, डेडलिफ्टचे सुवर्णपदक श्रीब गोस्वामी आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शीतल यांनी ८४ किलो वजनी गटातून सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये त्यांनी डेडलिफ्ट १३० किलो, बेंच प्रेस ५५ किलो यासह एकूण फुल पॉवरलिफ्टिंग ३०५ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव यशस्वीरीत्या कोरले आहे. लग्नानंतर संसार सांभाळून व शिकण्याची जिद्द कायम ठेवून शीतल ढोमसे यांनी शिक्षकी पेशात पदार्पण केले. त्यानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यात यशस्वीही झाल्या. त्यांनी आजपर्यंत दोन वेळा जिल्हास्तरीय, दोन वेळा राज्यस्तरीय, दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक, कल्याण येथील ओपन डेडलिफ्ट चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर, नाशिक येथील ओपन डेड लिफ्ट चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर, नाशिक येथे वन लाइफ फिटनेस ओपन डेड लिफ्ट कॉम्पिटिशनमध्ये सुवर्णपदक, व्ही. एस. के. ओपन डेडलिफ्टमध्ये सिल्वर आदी ठिकाणी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. असोसिएशनचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी श्रीबास गोस्वामी, पल्लवी गोस्वामी, नाशिकचे अध्यक्ष विनोद गांगुर्डे, ज्ञानेश्वर ढोमसे, उदय वाल्मीकी आदी उपस्थित होते. ------------ कोट तंत्रज्ञान, विज्ञान व स्पर्धेच्या युगात स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन माघार न घेता आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये गरुडझेप घेण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्नांती नक्कीच यश मिळू शकते. - शीतल ढोमसे, विजेत्या स्पर्धक --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

Pune DPC Meet: प्रशासकीय खर्च कपातीसाठी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन; मोदींच्या आवाहनानुसार तातडीने अंमलबजावणी

ZP School Teacher Crisis : नविन शैक्षणिक वर्षात तरी शिक्षक मिळेल का? टाकळी राजेराय प्रशालेत शिक्षकांच्या कमी मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

HBA Interest Rate: घर खरेदी-बांधणीसाठी स्वस्त कर्जाचा फायदा कायम! HBA व्याजदरात वाढ नाही; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT