२०-१
हयातीचा दाखला
आनलाइन सादर करा
अन्यथा निवृत्तीवेतन बंद
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता. १४ ः केंद्र व राज्य पुरस्कृत विविध निवृत्तीवेतन योजनांतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करता यावे, यासाठी BSA (Beneficiary Satyapan App) ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी आता डिजिटल प्रमाणपत्र सहजपणे सादर करता येणार आहे.
ऑनलाईन हयात दाखला सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचा निवृत्तीवेतन लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर DLC प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना यांतील लाभार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे किंवा आपले सरकार सेवा केंद्र, सेतु सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र आदी ठिकाणी जाऊन ऑनलाईन हयात दाखला सादर करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे आवाहन निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.