नाशिक

निफाडच्या महिलांचा संकल्प

CD
NPH26B08453 निफाड ः येथे सहा दिवसीय योग शिबिरात सहभागी झालेल्या महिला. ------------ ३६-४ हर दिन योगाची महिलांनी घेतली शपथ ------------ निफाड येथे योग शिबिराला महिलांचा जोरदार प्रतिसाद ------------ सकाळ वृत्तसेवा निफाड, ता.२२ ः येथील योग असोसिएशनतर्फे झालेल्या सहा दिवसीय योगशिबिराची सांगता आंतरराष्ट्रीय योग दिनी झाली. विशेष म्हणजे समारोप प्रसंगी उपस्थित सर्व महिलांनी ‘हर दिन योगा, हर घर योगा’ ही शपथ घेऊन नियमित योगाभ्यासाचा संकल्प केला. शिबिरामध्ये प्राणायाम साधना, प्राणाकर्षण क्रिया, विविध उपयुक्त उभी व बैठी आसने, नमन मुद्रा, सिंह मुद्रा, अश्विनी मुद्रा तसेच मूलबंध व जिव्हाबंध याविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिके असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा डेर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आसनक्रिया व सूक्ष्म व्यायामांचाही सराव करण्यात आला. प्रमुख अतिथी वनविभागाचे दर्शन सूर्यवंशी यांनी महिलांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत आरोग्य जपण्याचा संदेश दिला. डॉ. डेर्ले यांनी प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असून तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून असते. महिला निरोगी व तंदुरुस्त राहिल्यास कुटुंब आणि पर्यायाने समाजही सुदृढ होण्यास मदत होते असे प्रतिपादन केले. वैनतेयच्या माजी प्राचार्या मालती वाघावकर यांनी प्रास्ताविकात, स्वतःच्या शरीराला व मनाला न्याय देण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याचे आवाहन केले. प्रिया चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. चित्रा जेऊघाले यांनी आभार मानले. मनीषा वाघ, संगीता शिंदे व प्रसन्ना कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केली. शिबिरात लीना छाजेड, पूजा मगर, आरती व्यवहारे, पल्लवी बिनायकीया, शकुंतला धारराव, सोनाली व्यवहारे, आशाताई पंडित, शैला व्यवहारे, दीप्ती तिवारी, नेहा कडलग, सुरेखा भोई, मनीषा व्यवहारे, नेहा सोनवणे, वैशाली सोनवणे आदी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोपावेळी सर्व महिलांनी ‘हर दिन योगा, हर घर योगा’ ही शपथ घेऊन योगाचा प्रसार घराघरांत करण्याचा निर्धार व्यक्त केला. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT