पान-१ मेन जाड
------------
द्राक्ष पंढरीमध्ये
मान्सूनची हजेरी
निफाड ः आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला सोमवारी पावसाने दिलासा दिला. लासलगाव, विंचूर, नैताळे, कानळद, नांदगाव, धानोरेसह परिसरातील गावांमध्ये सोमवारी (ता.२२) दुपारी तीनच्या सुमारास पाऊणतास मुसळधार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावत मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली. महिनाभरापासून पावसाची प्रतीक्षा असल्याने बळीराजाचा जीव भांड्यात पडला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची सर्व कामे वेळेत आटोपली आहेत. यंदा तालुक्यात सोयाबीन व मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याचा अंदाज आहे.
------------