पान-३
NPH26B08658
निफाड ः येथे शिवसेना युवासेनेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर, समवेत दत्ता गायकवाड, अनिल कदम, जयंत दिंडे, नितीन आहेर व इतर पदाधिकारी.
---------
निफाडचा भगवा बुलंद करण्यास मैदानात उतरा
मिर्लेकर यांचे आवाहन ः निफाडला संघटनात्मक बांधणीसह एसआयआरचा आढावा
-------------
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.१ ः निफाड तालुक्यात शिवसेनेचा भगवा अधिक बुलंद करण्यासाठी शिवसैनिकांनी आता गावागावात, वाडी-वस्तीवर आणि बूथनिहाय मैदानात उतरावे, असे आवाहन शिवसेना संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. निफाड तालुका शिवसेना-युवासेनेच्या हॉटेल दुर्गा नक्षत्र हॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर उपनेते दत्तानाना गायकवाड, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख राजू पाटील, जिल्हाप्रमुख नितीन आहेर, उपजिल्हाप्रमुख नीलेश साळुंखे, निवृत्ती जगताप, महेश गाडगे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, माजी सभापती शिवा पाटील सुरासे, शहरप्रमुख संजय धारराव, रमेश जेउघाले, युवासेना तालुकाप्रमुख नीरज चोरडिया आदी उपस्थित होते.
रवींद्र मिर्लेकर यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेच्या कामाचा आढावा घेतला. बूथनिहाय कामाबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या कामात हलगर्जीपणा न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. निफाडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने स्वतःला बूथशी जोडले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. निफाडचे माजी आमदार अनिल कदम, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे आणि जिल्हाप्रमुख नितीन आहेर, निफाड तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीत एसआयआर मोहिमेचा आढावा, बूथनिहाय संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क अभियान आणि आगामी पक्षीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. पदाधिकारी व शिवसैनिकांनी आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम रंधवे यांनी आभार मानले. बैठकीस ओझरचे गटनेते सुनील कदम, माजी सभापती पंडित आहेर, सोमनाथ पानगव्हाणे, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, आशिष मोगल, बाळासाहेब जाधव, उपतालुकाप्रमुख दत्तू भुसारे, प्रकाश वाटपाडे आदीसह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
------------
कोट
आगामी काळात शेतकरी, कष्टकरी, युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे.जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट करून संघटना मजबूत करण्यासाठी झटावे
- अनिल कदम, माजी आमदार, निफाड
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.