३०-२
शांतीलाल सोनी पतसंस्थेतर्फे
दहा टक्के लाभांश घोषित
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.२ ः येथील स्व. शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवनेरी लॉन्स येथे संस्थेचे अध्यक्ष अशोक पोफळीया यांच्या अध्यक्षतेखाली होलून सभासदांना दहा टक्के लाभांश वाटपाची घोषणा करण्यात आली.
सभेपूर्वी सकाळी नऊला सभासदांकरीता सहकार विकास अधिकारी पी. एम. धनगर यांचे प्रशिक्षण झाले.
संस्थेचे आद्य प्रवर्तक स्व. शांतीलालजी सोनी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सभेस सुरुवात झाली. अध्यक्ष पोफळीया यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा सादर करताना संस्थेला या आर्थिक वर्षात एक कोटी ७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून संस्थेस लेखापरिक्षणात ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेस सहकार दीपस्तंभ हा पुरस्कार मिळाल्याबाबत सभासदांना माहिती दिली. संस्थेच्या ‘अ’ वर्ग सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचे जाहिर केले. संस्थेच्या प्रगतीबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले.
सभेत नंदकिशोर कापसे, विनायक शिंदे, स्वप्निल बिनायकिया, उत्तमराव निरभवणे, महेश चोरडीया, मधुकर शेलार, विजय धारराव, संजय गाजरे, अशोक कराड, सचिन गिते, शंकर कडलग आदींनी विधायक सूचना मांडल्या. संस्थेचे संचालक मधुकर राऊत, संजय कुंदे व संस्थेचे अधिकारी शाम भंडारे उपस्थित होते. प्र.व्यवस्थापक चंद्रकांत वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रतीक बाफणा यांनी आभार मानले. संस्थेच्या उपाध्यक्षा मीना कुंदे, संचालक नितीन कापसे, संजय लुंक्कड, अंबादास गोळे, पुंडलिक कर्डीले, मधुकर राऊत, पवन चोरडीया, भास्करराव ढेपले, संतोष आहेरराव, संपतराव कराड, हेमंत खडताळे, सविता कापसे आदींसह सभासद बहुसंखेने उपस्थित होते.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.