नाशिक

निफाड तालुक्यात संकल्प सेवा अभियानाला सुरवात

CD
सेवा संकल्प अभियानाला निफाड तालुक्यात सुरवात महिनाभर सेवा शिबिरे; योजनांचा थेट लाभ निफाड, ता.१७ : शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या कमी करून विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचविण्यासाठी निफाड तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून सेवा शिबिरे घेऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. ------------- तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने सेवा सेतूच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी सेवा पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना शिबिरांमध्येच सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अभियानात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत सातबारा मोहीम, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, जमीन खरेदी-विक्री व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे यासह विविध कामांना गती दिली जाणार आहे. याशिवाय शिधापत्रिका, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकरी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि शिकाऊ वाहन चालक परवाना यांसारख्या नागरिकोपयोगी सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाणे ATSची मोठी कारवाई! कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला डोंबिवलीजवळ केली अटक

Sangli Sugarcane Price : 'ऊसदर जाहीर करा, अन्यथा धुराडी बंद पाडू'; राजू शेट्टींचा सांगलीतील साखर कारखानदारांना 2 दिवसांचा अल्टिमेटम, केल्या 5 मोठ्या मागण्या

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

SCROLL FOR NEXT