नाशिक

निफाडचे पाणी खाली सोडलेच कसे?

CD
पान-१ मेन -------------- निफाडचे पाणी सोडलेच कसे? ------------ नांदूरमध्यमेश्वरच्या पाणी विसर्गाची उच्चस्तरीय चौकशी करा; कदम ------------ सकाळ वृत्तसेवा निफाड, ता.८ ः तालुक्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, नागरिक आणि पशुधन पाण्याच्या गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर असताना नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाणी सोडण्याच्या निर्णयावरून निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शासन आणि जलसंपदा विभागाला धारेवर धरले आहे. निफाडची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची, शेतीची आणि पशुधनाची गरज सुरक्षित न करता हजारो क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी अनिल कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ----------------- निफाड, चांदवड आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश अलीकडेच देण्यात आले आहेत. त्यामुळे निफाडमधील पाणीस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज असताना उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे होणे अपेक्षित असल्याचे अनिल कदम यांनी म्हटले आहे.निफाडच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपत असताना आणि पाण्याची चिंता वाढलेली असताना उपलब्ध पाणी बाहेर सोडण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला गेला असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे. १६-१ हक्काचे पाणी सुरक्षित ठेवा नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाणी हे जनतेचे सार्वजनिक संसाधन असून त्याच्या वापराबाबत स्थानिक गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुधन, आगामी हंगामातील पाण्याची गरज आणि पर्यावरणीय आवश्यकता यांचा सर्वंकष विचार केल्याशिवाय मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी कदम यांनी केली आहे. जिल्ह्यातील धरणसाठा समाधानकारक असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली असली तरी प्रशासनाने भविष्यातील पाण्याचे नियोजन आणि पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. १६-१ आदेश, अहवाल सार्वजनिक करा नांदूरमध्यमेश्वरमधून पाणी सोडण्याचा निर्णय नेमका कोणत्या तांत्रिक अहवालाच्या, कोणत्या आदेशाच्या आणि कोणत्या जलव्यवस्थापन निकषांच्या आधारे घेण्यात आला, याची संपूर्ण माहिती शासनाने जनतेसमोर आणावी, या निर्णयामध्ये कोणताही राजकीय अथवा प्रशासकीय दबाव होता का, याची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निफाडच्या जनतेच्या हक्काच्या पाण्यावर कोणाचाही डोळा सहन केला जाणार नाही, असा इशारा अनिल कदम यांनी दिला आहे. ----------- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय दबावापोटी निफाडचे पाणी नगरला पळविले आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांना दूरध्वनीद्वारे जाब विचारला आहे. मात्र वरिष्ठांच्या आदेशाने हा विसर्ग केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी. - अनिल कदम, माजी आमदार,निफाड ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

SCROLL FOR NEXT