नाशिक

विज्ञान सेमिनारमध्ये जय बाबाजी स्कूल जिल्ह्यात प्रथम;

CD
NRS26B02376 नाशिक ः जिल्हास्तरिय विज्ञान मेळाव्यात जिल्हात प्रथम पारितोषिक मिळविलेल्या जय बाबाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मान्यवर. ------------ ३०-२ नगरसूल येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ----------- सलग दुसऱ्या वर्षी कामगिरीमुळे जल्लोष सकाळ वृत्तसेवा नगरसूल, ता.३ ः येथील जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातील विज्ञान मेळाव्यात उत्कृष्ट सादरीकरण करत शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी सलग दुसऱ्यांदा निवड होण्याचा बहुमान मिळविला आहे. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७- आव्हाने आणि संधी’या विषयावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध व प्रभावी मांडणी केली. भारताच्या भविष्यातील वाढत्या ऊर्जेच्या गरजा,नवीकरणीय ऊर्जा स्रोत,ऊर्जा बचत, आधुनिक तंत्रज्ञान,ऊर्जा स्वावलंबन तसेच ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने व संधी यांचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून विषयाची प्रभावी मांडणी केली. विद्यार्थ्यांचे आकलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, अभ्यासपूर्ण मांडणी, वक्तृत्वशैली आणि प्रभावी सादरीकरण यांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. मागील वर्षीही जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द व मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT