नाशिक

नीटचा पेपर पुणे व्हाया नासिक टू गुरुग्राम

CD
दहा लाखांत खरेदी, पंधरा लाखांत विक्री टेलिग्रामद्वारे गुरुग्रामपर्यंत पेपर पोहोचल्याचा संशय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिकच्या शुभम खैरनार याने अहमदनगरच्या धनंजय लोखंडे याच्याकडून दहा लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी करून ती हरियाणातील गुरुग्राम येथील संशयिताला टेलिग्रामद्वारे १५ लाख रुपयांत विकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मध्य प्रदेशातील सिहोर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला शुभम खैरनार हा मेडिकल विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन वर्ग घेत होता. याच माध्यमातून त्याचा धनंजय लोखंडे याच्याशी संपर्क आला. तीन मे रोजी ‘नीट’ परीक्षा होण्यापूर्वीच, दोन दिवस आधी शुभमने धनंजयकडून दहा लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. धनंजयने पुण्यातून कुरिअरमार्फत प्रश्नपत्रिका शुभमपर्यंत पोहोचविल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर शुभमने टेलिग्रामच्या माध्यमातून ती प्रश्नपत्रिका गुरुग्राम येथील संशयिताला १५ लाख रुपयांत विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून शुभमने लाखो रुपये कमावल्याची माहितीही तपासात पुढे आली असून, त्यातूनच त्याची धनंजय लोखंडेशी ओळख झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका विक्रीनंतर शुभमने पेहराव बदलून नाशिकमधून पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, सीबीआयच्या सूचनेनुसार शहर गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सध्या शुभम सीबीआयच्या ताब्यात असून, धनंजय लोखंडेलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता इतर राज्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत असून, तपास यंत्रणा अधिक खोलवर चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT