नाशिक

काजळे, पाटील यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

CD
काजळे, पाटील यांची कारागृहात रवानगी नाशिक, ता. १३ : शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याच्या नियमाला फाटा देत बनावट दस्तऐवजाद्वारे म्हाडाची फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेले भूमिअभिलेख कार्यालयाचा उपअधीक्षक बिपिन काजळे (५५, रा. सार्थक हाईटस्, काळेनगर, आनंदवल्ली), महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील (४३, रा. नाशिक) या दोघांना बुधवारी (ता. १३) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात केली आहे. शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये तुकडेबंदी कायद्याच्या आधारावर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यासंदर्भात भूमि-अभिलेख कार्यालयाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात १९४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. नाशिक तालुक्याचे अपर नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्या अटकेनंतर पोलिसांनी नाशिक महापालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील, भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक तसेच या गुन्ह्याचे फिर्यादी असलेले बिपिन काजळे यांना अटक केली होती. कल्पेश पाटील आणि काजळे यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली यामुळे दोघांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह मध्ये रवाना करण्यात आले दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलिसांकडून विकासकांसह काही जमीन मालकांना नोटिसा बजावण्यात येऊन चौकशीला पाचारण केले आहे तर काही विकासक हे चौकशीला हजर राहत आहेत तर काहींनी गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिकमधून पलायन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Yerwada Prison Escape : येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; आठवड्यातील दुसरी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

राधिका सुभेदारची जय खानोलकरच्या ऑफिस मध्ये एन्ट्री! येताच घातली कडक अट, 'सनई चौघडे'मध्ये नवीन ट्विस्ट

अब इंडिया के लिये …’ विराटने देवदत्तला नेमकं काय सांगितलं? स्टंप माईकमधला VIDEO व्हायरल!

Video : ना जेवण, ना पाणी, ना ब्रेक...8 तासांच्या शिफ्टमध्ये माणसांपेक्षा चांगलं काम करतोय हा AI रोबो? थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT