नाशिक

सहा संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

CD
सहा संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले --- टीसीएस प्रकरणात युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : बहुराष्ट्रीय टीसीएस या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी सर्व संशयितांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांनी आरोपींविरोधात सक्षम पुरावे असल्याचे नमूद करीत जामीन नाकारला. यात आसिफ अन्सारी, रझा रफीक मेमन, शाहरुख कुरेशी, शफीक शेख, तौसिफ अत्तार, अश्विनी अशोक चेनानी यांचा समावेश आहे. बचाव पक्षाचा युक्तिवाद - आरोपी तपासात सहकार्य करीत होते - अटक बेकायदेशीर होती - कोणतेही धर्मांतर झाले नाही - महिलांना त्रास किंवा छेडछाड करण्यात आलेली नाही - व्यवस्थापक अश्विनी चेनानी यांच्या बाजूने तर पीडितांकडून लेखी तक्रार नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद - आरोपी तपासात सहकार्य करीत नव्हते - निदा खान तब्बल ४० दिवस फरारी होती - आरोपी फरारी होण्याची शक्यता होती - पीडितांच्या असहायतेचा गैरफायदा घेत अत्याचार करण्यात आले - विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केला युक्तिवाद - सहायक सरकारी वकील व्ही. आर. गायकवाड यांनी केली मदत पीडित युवतीने न्यायालयात मांडली व्यथा - सुनावणीदरम्यान एका पीडित युवतीने न्यायालयात हजर राहत स्वतःवर आणि इतर मुलींवर झालेल्या कथित अत्याचारांची माहिती दिली. आरोपींनी परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तिने केला. या कारणाने फेटाळले - आरोपींविरोधात प्राथमिक पुरावे आहेत - तपास सुरू आहे - संशयित आरोपी बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT