नाशिक

रामवाडी पुलाखाली आढळले मृत अर्भक

CD
रामवाडी पुलाखाली आढळले मृत अर्भक नाशिक : पंचवटीतील रामवाडी पुलाखाली गोदावरी नदीपात्राजवळ एक नवजात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गस्तीवर असलेले बीट मार्शल किसन गायकवाड आणि भूषण साळवे यांना एका नागरिकाने पुलाखाली बाळ असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेतली असता, झाडीझुडपांत एक नवजात बालक बेशुद्ध अवस्थेत सापडले. परिसरात त्याच्या पालकांचा शोध घेण्यात आला, मात्र कोणीही आढळले नाही. पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व अतिरिक्त पथकाने बाळाला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करत अज्ञात जन्मदात्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Akola Atrocity Act News: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रकरणांत कायद्याचे तंतोतंत पालन करा : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देश

मोठी बातमी! TMC च्या ६० आमदारांनी ममता बॅनर्जीना अध्यक्षपदावरून हटवलं, अभिषेक बॅनर्जींनाही केलं सस्पेंड, राजकारण तापलं...

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Latest Marathi News Live Update: पीकविम्याच्या योजनेत बदलाची गरज सॅटेलाइट सर्वेत अडचण; लाभातून यवतमाळ जिल्हा वगळला

SCROLL FOR NEXT