नाशिक

लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

CD
लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरी १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या रामचंद्र अडके यांना न्यायालयाची शिक्षा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदार रामचंद्र राजाराम अडके यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. न्यायालयाने त्यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. २०१४ मध्ये नाशिक तालुका पोलिस ठाण्यात तक्रारदार आणि त्यांच्या चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस कोठडी न घेता दोघांना थेट न्यायालयात हजर करण्यासाठी अडके यांनी २३ सप्टेंबर २०१४ रोजी पंचांसमक्ष १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार २४ सप्टेंबर २०१४ रोजी गिरणारे आऊट पोस्ट येथे पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडके यांना रंगेहाथ पकडले. पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात खटला चालला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सचिन गिरवाडकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पुरावे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने अडके यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलिस निरीक्षक विकास लोंढे, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, प्रभाकर गवळी आणि किरण धुळे यांनी खटल्याचा पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT