नाशिक

दत्ता जाधव

CD
फोटो : B02934 -------------- मालवीय चौकात मुख्य जलवाहिनी फुटली लाखो लिटर पाणी वाया; पुरवठ्यावर परिणाम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : पंचवटीतील मालवीय चौक त्रिफुलीवर गुरुवारी (ता. १४) पहाटे या भागात पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी सांडव्यावरील देवी मंदिराजवळ थेट नदीपात्रात मिसळत होते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेल्याने या भागातील सकाळी नळाला पाणीच न आल्याने महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पुढील वर्षीच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात रस्ते, जलवाहिनींसह ड्रेनेज लाइनची कामे ठेकेदारामार्फत सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी मालवीय चौकातील त्रिफुलीवर ठेकेदारामार्फत कामे करण्यात आले. या वेळी पाइपलाइनमध्ये पाणी नसल्याने लिकेज लक्षात आले नाही, मात्र पहाटे पाच वाजता पाणीपुरवठा सुरू होताच, फुटलेल्या पाइपलाइनमधून पाण्याचा कारंजा सुरू झाला. जवळपास दीड तास हे पाणी वाहत होते. पुढे हे पाणी रस्त्यावरून सांडव्यावरील देवी मंदिराजवळ थेट गोदापात्रात मिसळत होते. गंगापूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल, असा जेमतेम पाणीसाठा असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकारी नागरिकांना करतात, दुसरीकडे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे येथील अनेक ठिकाणी गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT