नाशिक

Datta Jadhav

CD
०२९७८ नाशिक : ऑलिम्पिकदिनानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या क्रीडा रॅलीत सहभागी विद्यार्थी. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त क्रीडा रॅली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : जागतिक ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधत मंगळवारी (ता.२३) सकाळी कालिका मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि डीएसएफच्या वतीने क्रीडा रॅली काढण्यात आली. काळाराम मंदिर ते कालिका मंदिर संस्थानपर्यंत ही रॅली होती. १६७ खेळाडू यात सहभागी झाले होते. रॅलीपूर्वी ऑलिम्पियन खेळाडू, अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. उपस्थित खेळाडूना रवींद्र नाईक आणि दत्तू भोकनळ यांनी ऑलिम्पिक दिनाचे महत्व सांगितले. यावेळी अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, उदय खरे, अविनाश ढोली, सुनील पूर्णपात्रे, निहार शहा, दीपक निकम, चिन्मय देशपांडे, मनीष बोरस्ते, शरद पाटील, भूषण सोननिस, तन्मय कर्णिक, कुणाल अहिरे आदींच्या उपस्थितीत रॅलीला सुरवात झाली. कालिका मंदिर येथे कालिका संस्थांनचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील आणि यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी रॅलीचे स्वागत केले. या उपक्रमांतर्गत ३० जूनपर्यंत तलवारबाजी, कॅरम, फूटसाल, सेपक टकरा, जम्परोप, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.२६) म्हसरूळ परिसरातील चामर लेणी, येथे बीज उधळण आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अशी माहिती आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT