नाशिक

आयटक महाराष्ट्राचे २०वे राज्य अधिवेशन नागपुरात

CD
आयटक महाराष्ट्रचे २० वे राज्य अधिवेशन नागपूरला ३ ऑक्टोबरला ‘संविधान बचाव-कामगार बचाव’ रॅली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) महाराष्ट्रचे २० वे राज्य अधिवेशन ३ व ४ ऑक्टोबरला नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या पोस्टरचे प्रकाशन दिल्ली येथे ‘आयटक’च्या राष्ट्रीय महासचिव अमरजीत कौर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संतोष कुमार, ॲड. सुभाष लांडे, डॉ. राम बाहेती, ‘आयटक’च्या राष्ट्रीय सचिव बबली रावत, ‘आयटक’ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस श्याम काळे आणि राज्य सचिव राजू देसले यांच्या हस्ते झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (ता. ३) सकाळी दहला नागपूरच्या बालभवन येथून ‘संविधान बचाव–कामगार बचाव’ रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली संविधान चौक येथे पोहोचणार असून, तेथे जाहीर सभा होणार आहे. ‘आयटक’च्या राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर, खासदार पी. संतोष कुमार, खासदार श्याम बर्गे, मोहन शर्मा, सुकुमार दामले, बबली रावत, सी. जोसेफ मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाला राज्यभरातील पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ‘आयटक’शी संलग्न विविध युनियनचे हजारो कामगार, कर्मचारी व योजना कर्मचारी ‘संविधान बचाव–कामगार बचाव’ रॅलीत सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्व कामगार, कर्मचारी व संघटनांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आयटक’ महाराष्ट्रचे राज्य महासचिव श्याम काळे यांनी केले आहे. अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारच्या कामगार धोरणांचा आढावा घेत कामगार कायद्यातील बदल, खासगीकरण, भांडवलदारधार्जिणी धोरणे आणि कामगारांच्या हक्कांवरील वाढते आक्रमण याशिवाय आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, उमेद कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, ईएसआय, पीएफ, ग्रॅज्युइटी व पेन्शन लागू करणे, बांधकाम कामगार आणि घरकामगारांसह असंघटित कामगारांना व्यापक सामाजिक सुरक्षा देणे यांसह विविध मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार असून, विशेष स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: एक दोन चपाटी मारणे म्हणजे हल्ला करणं नसतं- आनंद दवे

SCROLL FOR NEXT