नाशिक

नाशिकच्या भविष्यासाठी रुद्र पूजा

CD
04878 नाशिक : रुद्रपूजा करताना स्वामी वैशंपायन. शेजारी महापौर हिमगौरी आडके. ऑर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे शहरात रूद्रपुजा, सत्संग नाशिक, ता. १ : महापौर हिमगौरी आडके यांच्या पुढाकारातून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून प्रसाद मंगल कार्यालयात सोमवारी (ता.३१) रुद्रपूजा व सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ निर्विघ्न व यशस्वीपणे पार पडावा यासाठी भगवान महादेवाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. स्वामी वैशंपायन यांच्या विशेष सान्निध्यात विधिवत रुद्रपूजा, रुद्राभिषेक, मंत्रोच्चार, शिवआराधना, सत्संग आणि महाआरतीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, एनएमआरडीए आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सभापती सुरेश पाटील, नगरसेविका स्वाती भामरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक ॲड. विशाल चव्हाण, उमेश मराठे, उल्हास पाटील, विजय हाके, गायक सारंग गोसावी, अद्वैत राव, हेमंत भालेराव, सचिन विधाते, कौस्तुभ भारोटे, सुधीर अमोदे, सायली चितोरकर, रोहिदास ढिकले यांच्यासह परिसरातील मान्यवर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते, शिवभक्त उपस्थित होते.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Marathi News Live Updates : माहिममध्ये भाजप-मनसे आमनेसामने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Ulhasnagar Metro: व्यापारनगरीपर्यंत मेट्रो! उल्हासनगरपर्यंत मार्गिकेला केंद्राची अधिसूचनेद्वारे मंजुरी

SCROLL FOR NEXT