नाशिक

35 शाळा बाह्य मुले

CD
महापालिकेच्या सर्वेक्षणात ३५ शाळाबाह्य मुले सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष शोध मोहिमेत शहरात ३५ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील ३४ मुला-मुलींनी आजवर एकदाही शाळेची पायरी चढलेली नाही, तर एक मुलगी अनियमिततेमुळे शाळाबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका शिक्षण विभागाने ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने शहरभर विशेष मोहीम हाती घेतली होती. यासाठी केंद्रनिहाय शिक्षकांची शोध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमध्ये प्रशासनाधिकारी, पर्यवेक्षक, शिक्षकांसह अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांचाही समावेश करण्यात आला होता. या मोहिमेदरम्यान प्रामुख्याने शहरातील सिग्नल, चौक, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसर आणि स्थलांतरित मजुरांच्या वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. अनेक कुटुंबे रोजगारानिमित्त स्थलांतरित झाल्याने त्यांची मुले शिक्षणापासून दूर राहिल्याचे निदर्शनास आले. पथकाने संबंधित पालकांशी थेट संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ------------------- मुलींची संख्या अधिक सर्वेक्षणात आढळलेल्या ३५ शाळाबाह्य मुलांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. यात २२ मुली आणि १३ मुलांचा समावेश आहे. या सर्वांची नोंद घेऊन त्यांना त्यांच्या निवासस्थानालगतच्या महापालिका शाळांमध्ये तातडीने प्रवेश देण्यात आला आहे. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आढळलेल्या ३५ मुला-मुलींना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला असून, त्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. - डॉ. मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT