नाशिक

भूसंपादन प्रक्रियेला वेग

CD
सिंहस्थ रस्त्यांसाठी भूसंपादनाला ‘टाईमलाईन’ विहित मुदतीत प्रकरणे निकाली काढण्याचे आयुक्तांचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रस्तावित प्रमुख रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. या कामांसाठी आवश्यक जागांच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र वेळापत्रकानुसार (टाईमलाईन) पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टीडीआरच्या माध्यमातून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्तांनी बुधवारी (ता.२) दिले. महापालिका आयुक्तांच्या दालनात आज नगरनियोजन विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत नगरनियोजन विभागाने बीपीएमएस प्रणालीवरील प्रलंबित बांधकाम परवानग्या, अभिन्यास व ले-आऊट परवानग्या तसेच टीडीआरशी संबंधित प्रकरणांचा अहवाल सादर केला. विकासकांना परवानग्या देताना अनावश्यक विलंब होता कामा नये, असे स्पष्ट करत आयुक्तांनी प्रत्येक फाईल विहित मुदतीत निकाली काढण्याचे आदेश दिले. कोणते प्रकरण किती दिवसांपासून प्रलंबित आहे आणि त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित ठेवू नये, तसेच विहित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सिंहस्थ रस्त्यांची कामे अडकणार नाहीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच नवीन रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या बहुतांश जागा टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. मात्र, भूसंपादनाची प्रक्रिया लांबल्यास त्याचा थेट परिणाम रस्त्यांच्या कामांवर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन भूसंपादनाशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची सद्यःस्थिती तपासून त्यासाठी स्वतंत्र टाईमलाईन तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे रखडलेले टीडीआर प्रस्ताव आता प्राधान्याने निकाली निघण्याची शक्यता असून, सिंहस्थाच्या तयारीतील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामांना वेग मिळण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT