नाशिक

कचरा टाकणाऱ्यांवर दहा हजारांचा दंड

CD
पान एक ॲंकर ------------------- रस्त्यावर कचरा टाकल्यास दहा हजाराचा दंड मनपाचा निर्णय; वारंवार नियम मोडल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : शहरात उघड्यावर कचरा टाकणे आणि अस्वच्छता पसरवणे आता नागरिकांना महागात पडणार आहे. नाशिक महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून थेट १० हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. वारंवार नियम मोडणाऱ्यांवर तर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली फौजदारी गुन्हा दाखल करून ५ वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई होणार आहे. मनपाने नवे निर्देश जारी केले आहेत. हे नियम फक्त नागरिकांसाठीच नाहीत, तर व्यापारी, सोसायट्या, हॉटेल्स, शाळा, महाविद्यालय आणि सर्व मोठ्या आस्थापनांसाठी बंधनकारक असतील. --------- कचरा चार प्रकारात द्यावाच लागणार घरातील आणि दुकानातील कचरा आता एकत्र देता येणार नाही. तो ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष काळजीचा कचरा अशा चार वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करूनच घंटागाडीतच द्यावा लागेल. वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर फेकणे हा थेट नियमभंग धरला जाईल. -------- मोठ्या आस्थापनांना ''बल्क वेस्ट जनरेटर''चा शिक्का ज्या प्रकल्पांचे बांधकाम क्षेत्र २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे, जे रोज ४० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी वापरतात किंवा जिथे रोज १०० किलो पेक्षा जास्त कचरा तयार होतो, त्यांना ''बल्क वेस्ट जनरेटर्स'' म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशा सर्व आस्थापनांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलवर नोंदणी करून आपल्याच आवारात कंपोस्टिंग किंवा बायोमिथेनेशनद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ---------- प्लॅस्टिक राडारोडा, थुंकणाऱ्यांवरही कारवाई सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणाऱ्यांना पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार आणि तिसऱ्यांदा २५ हजार रुपये दंडासह तीन महिने तुरुंगवास होऊ शकतो. बांधकामाचा राडारोडा उघड्यावर टाकल्यास वाहतूक खर्चाच्या दहापट दंड आणि फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. तर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणे आणि धूम्रपान करणे यावर दंडासोबत सार्वजनिक सेवा करण्याची शिक्षा ठोठावली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT