नाशिक

शहरात स्वाइन फ्लू चा वाढता धोका

CD
स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट; आठवड्यात ४६ नवे बाधित जिल्ह्यातील रुग्णसंख्या १९३ वर; डेंगीच्याही रुग्णांत वाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असून, गेल्या सात दिवसांत तब्बल ४६ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची एकूण संख्या १९३ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांनी ताप, खोकला व अंगदुखीसारखी लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत नाशिक शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचे केवळ २८ रुग्ण आढळले होते. मात्र जुलैअखेरीस पावसाला सुरुवात झाल्यानंतर संसर्गाचा वेग वाढला. ऑगस्ट महिन्यात तब्बल ११९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली, तर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ४६ नवे रुग्ण समोर आले आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात स्वाइन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला होता. यात दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ६९ वर्षीय वृद्धा, पिंपळणारे येथील ५५ वर्षीय पुरुष तसेच आडगाव परिसरातील ६६ वर्षीय रहिवाशाचा समावेश होता. त्यानंतर विसे मळा येथील महिलेचा तसेच सांगलीहून नाशिकमध्ये आलेल्या एका व्यक्तीचाही या आजाराने मृत्यू झाला आहे. डेंगीचाही वाढता धोका दरम्यान, शहरात डेंगीच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंगीचे ५६ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये आणखी ४५ जणांना लागण झाली, तर सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांत आठ नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे डेंगी बाधितांची एकूण संख्या १०९ वर पोहोचली आहे. डेंगी, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया आणि मलेरिया या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांनी ताप, खोकला, अंगदुखी अथवा तत्सम लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT