नाशिक

गणेश मंडळ बैठक

CD
मेन फोटो : H29292 --------------- खड्डेमुक्त विसर्जन मार्गाचे महापौरांकडून आश्वासन मंडप शुल्क माफीची परंपरा कायम; आरास स्पर्धा नव्याने होणार सुरू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : सार्वजनिक गणेशोत्सवाला महापालिकेचे भक्कम पाठबळ मिळणार असून उत्सव काळात मिरवणूक मार्गांवरील अडथळे दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. गुरुवारी (ता. १०) राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात झालेल्या मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापौर हिमगौरी आडके यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये मंडप उभारणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून यंदाही सूट देण्याचा निर्णय, तसेच रखडलेली आरास स्पर्धा नव्याने सुरू करण्याचा समावेश आहे. प्रशासकीय काळात बंद पडलेला आरास स्पर्धेचा उपक्रम पुन्हा रुळावर आणण्यात येणार आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी विजेत्या मंडळांना सहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची रोख पारितोषिके देण्याचे नियोजन असल्याचे महापौरांनी सांगितले. यामुळे मंडळांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर हिमगौरी आडके होत्या. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेटे, भाजप गटनेते श्याम बडोदे, सीमा ठाकरे, शाहु खैरे आदी उपस्थित होते. पुढील वर्षांपासून ही आढावा बैठक उत्सवाच्या तब्बल एक महिना आधी घेण्याचे सूतोवाच महापौरांनी केले. यंदाच्या बैठकीच्या नियोजनात जनसंपर्क विभागाकडून झालेल्या दिरंगाईबद्दल उपमहापौरांनी नाराजी व्यक्त करत मंडळांच्या प्रोत्साहनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज मांडली. आयुक्त मनिषा खत्री यांनी मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. उत्सव काळात संपूर्ण अधिकारी वर्ग मैदानात उतरेल आणि प्राप्त तक्रारींवर दिवसभरात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सिंहस्थाच्या विकासकामांमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींची जाणीव असल्याचे नमूद करत त्यांनी मंडळांकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ---चौकट घाटांवर जीवरक्षक तैनात उत्सव काळात शहरात कोणत्याही नव्या रस्ते खोदकामास परवानगी दिली जाणार नाही. विसर्जन मार्ग पूर्णपणे सुरळीत ठेवले जातील. महापौर आणि पदाधिकारी मंडळांना प्रत्यक्ष भेटी देतील, तर विसर्जन घाटांवर जीवरक्षक तैनात करून सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे निर्णय या बैठकीत जाहीर झाले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT