नाशिक

गरवारे एक्सलो रस्त्याची चाचणी

CD
फोटो : B04913 नाशिक : गरवारे ते एक्स्लो पॉइंट रस्त्याची गुणवत्ता चाचणी करताना कर्मचारी. -------- वेग वाढवा, पण गुणवत्तेशी तडजोड नको महापालिका आयुक्तांचे निर्देश; गरवारे ते एक्स्लो पॉइंट रस्त्याची गुणवत्ता चाचणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : गरवारे ते एक्स्लो पॉइंट रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गुरूवारी (ता. १०) प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीवेळी कामाची गती कायम ठेवतानाच गुणवत्तेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना देण्यात आल्या. १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गरवारे ते एक्स्लो पॉइंट तसेच पपया नर्सरी या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. शहराच्या दृष्टीने आणि औद्योगिक क्षेत्राच्या जोडणीच्या दृष्टीने हे दोन्ही मार्ग अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या उभारणीमुळे शहरातील प्रमुख भाग आणि औद्योगिक वसाहतींमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच उद्योजक, कामगार आणि मालवाहतूक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च २०२७ निश्चित करण्यात आली आहे. मात्र महापालिकेने कामाचा वेग वाढवून डिसेंबर २०२६ पर्यंत रस्ते वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानंतर जानेवारी- फेब्रुवारी २०२७ पर्यंत उर्वरित अंतिम स्वरूपाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प एकाच वेळी पूर्ण होण्याची वाट न पाहता, ज्या ठिकाणचे काम पूर्ण होईल ते टप्पे टप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे सुरू असलेल्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि दैनंदिन प्रवासातील त्रास कमी होण्यास मदत होईल. वेग वाढविताना गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिकेने घेतली आहे. महापालिकेच्या स्तरावर होणाऱ्या गुणवत्ता तपासणीसोबतच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फतही कामांची तपासणी केली जात आहे. याशिवाय तृतीयपक्ष संस्थेच्या माध्यमातून स्वतंत्र गुणवत्ता तपासणीही सुरू आहे. कामाच्या कोणत्याही टप्प्यात गुणवत्तेबाबत त्रुटी आढळल्यास संबंधित काम दुरुस्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आवश्यक त्या ठिकाणी केलेले काम काढून पुन्हा करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, गुणवत्ता अभियंता नितीन पाटील, अधीक्षक अभियंता गुणवत्ता नियंत्रण (निवृत्त) किशोर पाटील आणि उपायुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी उपस्थित होते. ------- कोट ------ वेग, वेळ आणि गुणवत्ता या तिन्ही बाबींचा समतोल राखून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, पूर्ण झालेले रस्त्यांचे टप्पे त्याआधीच वाहतुकीसाठी खुले करून नागरिकांना दिलासा देण्यावर भर आहे. - मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Marathi News Live Updates: पुणे-अहिल्यानगर रोडवर भीषण वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT