नाशिक

पाणीपट्टी अवघे 14 टक्के वसुली

CD
अवघी १४ टक्केच पाणीपट्टी वसुली थकबाकीत पंचवटी विभाग आघाडीवर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे तसेच एमएनजीएल, स्मार्टसिटी आणि विविध मोबाइल कंपन्यांच्या खोदकामामुळे शहरातील जलवाहिन्या जागोजागी फुटून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा थेट फटका महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीला बसला आहे. अनियमित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये पाणीपट्टी भरण्याबाबत उदासीनता निर्माण झाली असून थकबाकीचा आकडा १८७.७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ १४ टक्के वसुली होऊ शकली असून थकबाकीमध्ये पंचवटी विभाग सर्वांत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. सिंहस्थाअंतर्गत शहरातील २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असून डांबरी रस्ते खोदून त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्यांवरील वाहतूक वसाहतींतील रस्त्यांवर वळवण्यात आल्याने अवजड वाहनांमुळे अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यातच गॅस पाइपलाइनसाठी एमएनजीएलने तर सीसीटीव्हीच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी स्मार्टसिटी कंपनीने शेकडो किलोमीटर रस्ते खोदल्याने पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांचे हाल होत आहेत. या खोदकामादरम्यान शेकडो ठिकाणी जलवाहिन्या तुटल्याने पाणीपुरवठा अनियमित झाला असून नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. विभागनिहाय थकबाकीचा विचार करता पंचवटी विभागात सर्वाधिक ४५.३६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापाठोपाठ सिडको विभागात ३५.०३ कोटी, नाशिक रोडमध्ये ३४.२४ कोटी, नाशिक पूर्वमध्ये ३३.०८ कोटी, सातपूरमध्ये २५.२५ कोटी तर नाशिक पश्चिम विभागात १४.७७ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. ---चौकट २९.४३ कोटीची वसुली शहरात एकूण २ लाख १९ हजार ८९८ नळजोडणीधारक असून, त्यांच्याकडे मागील थकबाकीची १७१ कोटी आणि चालू वर्षाची ४६.०९ कोटी रुपये अशी एकूण मागणी होती. त्यापैकी १ एप्रिल ते १० सप्टेंबर या कालावधीत मागील वर्षाची १३.४४ कोटी आणि चालू वर्षाची १५.९८ कोटी अशी एकूण २९.४३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT