नाशिक

पार्किंग संदर्भात बैठक

CD
एन्कर --------------- विकसित सार्वजनिक पार्किंगवर विकासकांचाच ताबा महापालिका आयुक्तांची कबुली; अतिक्रमित पार्किंग स्थळे खुली करण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्ते आधीच अरुंद झाले असताना, समावेशक आरक्षणातून विकसित केलेली पार्किंग स्थळेही विकासकांच्या कब्जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडे हस्तांतरित करूनही या जागांचा वापर नागरिकांसाठी होत नसल्याची कबुली स्वतः आयुक्त मनिषा खत्री यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नगररचना, मिळकत आणि अतिक्रमण या तिन्ही विभागांनी संयुक्त मोहीम राबवून ही पार्किंग स्थळे नागरिकांसाठी खुली करण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आडके यांनी दिले आहेत. महापौर आडके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १५) खातेप्रमुखांची बैठक झाली. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थ कामांमुळे वाढलेली वाहतूक कोंडी आणि पार्किंग टंचाई यावर यात सविस्तर चर्चा झाली. या सर्व जागा विकासकांच्या ताब्यात असल्यास तातडीने मोकळ्या करून नागरिकांसाठी खुल्या कराव्यात, तसेच ही पार्किंग नागरिकांच्या हक्काची असल्याची जनजागृती करावी, असे निर्देश महापौर आडके यांनी दिले. नगररचना, मिळकत आणि अतिक्रमण विभागाने एकत्रित कारवाई करावी, असे आदेश आयुक्त खत्री यांनी दिले आहेत. -------- २५ आरक्षणांचा गैरवापर शहरात समावेशक आरक्षणाअंतर्गत (एआर) एकूण ३३ जागांवर आरक्षण आहे. त्यापैकी तब्बल २५ आरक्षणांचा गैरवापर झाल्याचे बैठकीत उघड झाले. पार्किंगसाठी २८ ठिकाणी आरक्षण असताना केवळ पाच भूखंडांच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. -------- विकसित पार्किंगवरही विकासकांचाच ताबा कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका बसस्थानकासमोर, आकाशवाणी टॉवर, सीता गुंफा आणि मेनरोड अशा पाच ठिकाणी एआरमधून पार्किंग विकसित करण्यात आली आहे. कागदोपत्री ही पार्किंग महापालिकेकडे हस्तांतरित झाली असली तरी प्रत्यक्षात विकासकच त्याचा वापर करीत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याचे आयुक्त खत्री यांनी सांगितले. कॅनडा कॉर्नर येथे पीएनजी ज्वेलर्सखालील एआर जागेवर महापालिकेचा फलक लावलेला असतानाही संबंधित विकासकाने तेथे कुलूप लावून पार्किंग बंद केल्याची माहिती आयुक्तांनी बैठकीत दिली. ---------- इतर जागांची स्थितीही गंभीर देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक १२२ मध्ये शॉपिंगसाठी आरक्षित क्षेत्रात पार्किंग विकसित झाली, मात्र महापालिकेकडे हस्तांतर झाले नाही. नाशिक शिवारातील सर्वे क्रमांक ४३२ मधील क्षेत्राचे बांधकामच झालेले नाही. टीपी स्कीम दोनमधील सर्वे क्रमांक ९९, १०० मध्ये ६०० चौरस मीटरवर पार्किंग विकसित असूनही वापर नाही. मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलच्या जागेवर ४ हजार चौरस मीटरमध्ये उभारलेले भूमिगत वाहनतळ खासगी वापरात आहे. पंचवटीतील सीता गुंफा येथील १ हजार २९० चौरस मीटर वाहनतळ महापालिकेने वापरात घेतलेलेच नाही, तर सीटीएस क्रमांक ५८७७ मधील पार्किंग इमारत तयार असूनही अनधिकृत वापर सुरू आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT