नाशिक

नाशिक रोड विभागीय अधिकारी बदली

CD
सेकंड मेन --------- नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्याची बदली सर्वपक्षीय नगरसेवकांची लक्षवेधी; कनिष्ठ लिपिकाची चौकशी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांची तातडीने शासन सेवेत बदली करण्याबरोबरच अतिक्रमण निर्मूूलन विभागाचा वादग्रस्त कनिष्ठ लिपिक अमित पवार याची चौकशी करण्याचे निर्देश महासभेत देण्यात आले. महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १६) महासभा पार पडली. या वेळी नाशिक रोड विभागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्यासह अतिक्रमण निर्मूूलन विभागाचा वादग्रस्त कनिष्ठ लिपिक पवार यांच्या कामकाजासंदर्भात लक्षवेधी मांडली. प्रभाग समिती सभापती रमेश धोंगडे यांनी विभागीय अधिकारी त्रिभुवन व कनिष्ठ लिपिक पवार यांच्याकडून सदस्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा पाढा वाचला. जुलैत झालेल्या प्रभाग समितीच्या सभेमध्ये अतिक्रमण विभागाचा कनिष्ठ लिपिक अमित पवार यांच्या संदर्भातील तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर बदली करावी, अशी मागणी विभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली, मात्र ती बदली झाली नाही. याउलट १५ सप्टेंबरला झालेल्या प्रभाग समितीच्या सभेत हाच लिपिक बैठकीला उपस्थित राहिला. या वेळी विभागीय अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी माझ्या अधिकारात बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचे सांगितले. या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभात्याग केला. विभागीय अधिकाऱ्यांकडून प्रभाग समिती सभापतींच्या आदेशाचे पालन होत नसेल तर हा अपमान आहे. पवार यांच्यासंदर्भात अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी असतानादेखील त्याची बदली केली जात नाही. यामागे हेतू काय असा सवाल उपस्थित करताना सभापती धोंगडे यांनी मिळकत विभागातील भालेराव नामक कर्मचाऱ्यांकडूनदेखील श्री गणेशमूर्ती विक्रीच्या ३३ गाळे लिलावांचा आरोप केला. या गाळे विक्रीचे पैसे गेले कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापौर आडके यांना धोंगडे यांनी विभागीय अधिकारी त्रिभुवन यांच्यासह पवार यांच्या बदलीचे पत्र दिले होते, त्यानंतरही बदली झाली नाही. प्रशासनाकडून पाठीशी घातले गेल्याचा आरोप धोंगडे यांनी केला. यासंदर्भात महापौर आडके यांनीदेखील विभागीय अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करून तातडीने त्यांना शासन सेवेत बदलीचे आदेश दिले तर महापालिकेचा कर्मचारी पवार यांच्या चौकशीचे आदेश दिले. धोंगडे यांच्यासह प्रशांत दिवे, शैलेश ढगे, सुनीता भोजने, योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे, रंजना बोराडे, कैलास मुदलियार, मंगला आढाव, विशाल संगमनेर, योगेश भोर, सतीश निकम, जयश्री गायकवाड, सीमा ताजने, कोमल मेहरोलीया, वैशाली दाणे, संजीवनी हंडोरे या सर्व सदस्यांनी लक्षवेधी मांडली होती. -------------चौकट कर्मचाऱ्याकडून मानहानीचा दावा महापालिका सभागृह व त्यानंतर प्रभाग समिती समस्या सोडविण्याचे मुख्य सभागृह आहे. येथे सदस्यांना महापालिका अधिनियमाप्रमाणे अधिकार असतात. महापालिकेचे कर्मचारी सभागृहात विचारलेल्या प्रश्नांवर खुलासा मागू शकत नाही किंवा जाब विचारू शकत नाही मात्र अतिक्रमण निर्मूूलन विभागाचे कर्मचारी अमित पवार यांनी अतिक्रमण विभागातील कारभारावरून विचारलेल्या व बदलीची मागणी केल्यानंतर उलट सदस्यांवर मानहानीचा दावा दाखल का करू नये, असे पत्र पाठविल्याने हा सदस्यांचा अवमान असल्याचा आरोप सभापती धोंगडे यांनी केला. -----------------

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT