नाशिक

होर्डिंग संघटनेचे महापालिकेसमोर निदर्शने

CD
मेन फोटो : H29797 --------- महापालिकेत जाहिरात घोटाळ्याचा आरोप आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनची निदर्शने सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : महापालिकेचे सुमारे दोन कोटी रुपयांचे शुल्क थकवलेल्या ठेकेदारालाच पुन्हा तब्बल १८ जाहिरात फलक उभारण्याची परवानगी दिल्याने नाशिकच्या जाहिरात व्यवसायात खळबळ उडाली आहे. या वादग्रस्त निर्णयाच्या विरोधात नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने बुधवारी (ता. १६) महापालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. संघटनेचा आरोप आहे की, २०२२ मधील ई-निविदा क्रमांक ५ मध्ये केवळ साधे जाहिरात फलक उभारण्याची तरतूद असतानाही कार्यादेशामध्ये परस्पर बदल करून संबंधित ठेकेदाराला होर्डिंग, युनिपोल, प्रकाशित फलक आणि एलईडी वॉल उभारण्याची मुभा देण्यात आली. मूळ निविदेत केवळ २८ जागांचा समावेश होता, मात्र प्रत्यक्षात ६० हून अधिक फलकांना मंजुरी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षेची अनामत रक्कम म्हणून केवळ २८ फलकांसाठीच सुमारे १२.५० लाख रुपये आकारण्यात आले, त्यामुळे अतिरिक्त फलकांमुळे महापालिकेच्या महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांच्या मधोमध, दुभाजक आणि वाहतूक बेटांवर नियमबाह्य पद्धतीने होर्डिंग्जना परवानगी देऊन सुरक्षेच्या नियमांनाही बगल देण्यात आली आहे. दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांकडून खाजगी जागांवरील फलकांसाठी आकारले जाणारे शुल्क प्रतिचौरस फूट २० रुपयांवरून थेट ९७ रुपये करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही शुल्कवाढ मागे घेऊन शासनाच्या नियमानुसारच शुल्क आकारावे आणि वादग्रस्त निविदा तात्काळ रद्द करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात अध्यक्ष विक्रम कदम, उपाध्यक्ष रवी शिरसाठ, सरचिटणीस गणेश बोडके, खजिनदार सौरभ जालोरी आणि सहचिटणीस सचिन गिते यांच्यासह मोठ्या संख्येने जाहिरात व्यावसायिक सहभागी झाले होते. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT