नाशिक

सिडकोत मलनिस्सारण व्यवस्था

CD
टुडे साठी ------- सिडकोच्या मलनिस्सारणासाठी ४३१ कोटींचा आराखडा गोदावरी प्रदूषण रोखण्यावर भर; प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी सिडको व परिसरातील मलनिस्सारण व्यवस्था नव्याने उभारण्याची तयारी सुरू केली आहे. जुन्या व वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या ठरत असलेल्या मलवाहिन्यांच्या जागी नवीन जाळे उभारण्यासाठी ४३१ कोटी २९ लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. नाशिक शहरात सिडकोकडून घरे तयार करण्यात आली. त्या वेळी तळमजल्यावरील घरांचा विचार करून मलनिस्सारण व्यवस्था तयार करण्यात आली होती. मात्र सद्यःस्थितीत सिडकोत लोकसंख्या वाढली व घरांची संख्यादेखील वाढली. एका माजल्याचे तीन मजले असे घरांचे रूपांतर झाले आहे. परिणामी जुन्या मलनिस्सारण वाहिन्यांवर ताण निर्माण झाला आहे. सिडकोची सध्याची लोकसंख्या ५.५४ लाखांच्या आसपास आहे. २०५५ पर्यंत विचार केल्यास हीच लोकसंख्या १२.८० लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सांडपाणीदेखील मोठ्या प्रमाणात वाढेल. भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रकल्पाची क्षमता निश्चित करण्यात आली आहे. योजनेत २०० ते १००० मिलिमीटर व्यासाच्या एकूण २६६.४ किलोमीटर लांबीच्या नवीन मलवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. अस्तित्वातील जुन्या वाहिन्या बदलल्या जाणार आहेत. योजनेत प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८ आणि २९ मधील संबंधित भागांसह वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, सद्गुरूनगर आणि गोविंदनगर या परिसरांचा समावेश करण्यात आला आहे. --चौकट पुढील महासभेत प्रस्तावावर चर्चा या भागातून संकलित होणारे सांडपाणी उंटवाडी आणि आगर टाकळी येथील पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून आगर टाकळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविले जाणार आहे. गोदावरीत जाणारे सांडपाणी पूर्णपणे अडवून ते प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविणे, म्हणजेच ‘इंटरसेप्शन ॲन्ड डायव्हर्जन’ पद्धतीने नदी प्रदूषणाला आळा घालणे, हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव जादा विषय म्हणून सादर करण्यात आला. सभेच्या पटलावरील सर्व धोरणात्मक निर्णयांचे प्रस्ताव तहकूब केल्याने या प्रकल्पावर तत्काळ निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पुढील महासभेत प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT