नाशिक

शहरात सहा जलकुंभ

CD
वाढत्या हद्दीसाठी सहा नवीन जलकुंभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणा बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत शहरातील विविध भागांत सहा नवीन उच्चस्तरीय जलकुंभ, जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी २८ कोटी १४ लाख ९८ हजार ७०७ रुपयांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. प्रस्तावित प्रत्येक जलकुंभाची क्षमता २० लाख लिटर असून २० मीटर उंचीवर त्यांची उभारणी केली जाणार आहे. वाढत्या उपनगरांतील पाण्याची गरज भागविण्यासोबत भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेतील विल्होळी येथील २७४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासह शहरातील विविध भागांत पाणीपुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. प्रस्तावित कामांमुळे बाह्य भागात वाढणाऱ्या नागरी वस्त्यांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे. ----------चौकट------ येथे होणार जलकुंभ सातपूर : पिंपळगाव बहुला शिवार नवीन नाशिक : पाथर्डी शिवार पंचवटी : हिरावाडी, शक्तीनगर पूर्व : नाशिक शिवार : नाशिक रोड : देवळाली शिवार, दुर्गा उद्यान पश्चिम : महात्मानगर सातपूर : सुला चौक ते आशीर्वादनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT