गणेश विसर्जन निमित्ताने पोलिसांकडून
महापालिका प्रशासनास सूचना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : लाडक्या गणरायाला शुक्रवारी (ता.२५) निरोप दिला जाणार आहे. विसर्जनानिमित्ताने शहरातील प्रमुख मिरवणुका आणि विसर्जन घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून आवश्यक सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत महापालिकेला पत्राद्वारे सूचनांची यादी पाठविण्यात आली आहे.
यामध्ये विशेषतः विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच घाटांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, घाटांवर क्रेनची व्यवस्था, जीवरक्षक दलाची नियुक्ती, अग्निशमन दलाचे पथक तैनात ठेवावी, जीवरक्षकांची नावे आणि संपर्क क्रमांक दर्शविणारे फलक लावण्यात यावेत, रस्त्यांवरील हातगाड्या आणि अतिक्रमण हटविण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे, सार्वजनिक ठिकाणचे अनधिकृत फलक आणि बॅनर काढावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आणि आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करणे याकडेही लक्ष वेधण्यासह निर्माल्य संकलनाची योग्य व्यवस्था करावी, घाट परिसर निसरडा होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात आणि कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात यावी, असेही या पत्रात म्हटले आहे. मूर्ती वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.