फोटो : H19151
--
प्रा. अपर्णा कुलकर्णी
यांना पीएच. डी. प्रदान
नाशिक : भोसला महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापिका अपर्णा कुलकर्णी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पीएच. डी प्रदान झाली. पदार्थ विज्ञान शाखेत त्यांच्या संशोधनाचा विषय होता. शोधप्रबंधासाठी त्यांना प्रा. डॉ. जी. एच. जैन, प्रा. डॉ. सारिका शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. डॉ. एम. के. देवरे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल भोसला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. पाटील व इतर प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.