नाशिक

कामात गती आणि गुणवत्ता राखावी- मुख्य कार्याकारी अधिकाऱ्यांचे निर्देश

CD
पान एक ॲंकर ------------------- 19171 फोटो ओळ : विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व विविध विभागांचे अधिकारी. अपूर्ण विकास कामे १४ दिवसात पूर्ण करा मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या विभागांना निर्देश सकाळ वृत्तसेवा नंदूरबार, ता. १४ : जिल्ह्यात अपूर्ण अवस्थेत असलेली कामे पुढील दोन आठवड्यात पूर्ण करावीत. तसेच कामात गती आणि गुणवत्ता राखावी, असे सक्त निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिले. श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय सभा पार पडली. या सभेत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सभेत महिला व बालविकास विभागांतर्गत २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील अंगणवाडी बांधकामांच्या सद्यःस्थितीचा अंगणवाडीनिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये जागेअभावी किंवा अन्य कारणांमुळे रखडलेली बांधकामे, अपूर्ण अवस्थेतील बांधकामे पुढील दोन आठवड्यांच्या आत पूर्ण करून संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, पूर्ण झालेल्या अंगणवाडी इमारती हस्तांतरण करून कामपुर्णत्वाचा दाखला व हस्तांतरण प्रमाणपत्र सादर करणे याबाबत चर्चा झाली. १५ वा वित्त आयोग प्राप्त अनुदान व झालेला खर्च आणि मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियान कामकाजाचा आढावा घेण्यात आला. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक सेवा देणे व देयक अदायगी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. सभेत घेतलेल्या निर्णयांचे आणि दिलेल्या सूचनांचे ''मुद्देनिहाय अनुपालन'' पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश सर्व खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. गतिमान प्रशासन आणि गुणवत्तापूर्ण विकासकामांसाठी सर्व क्षेत्रीय यंत्रणेने झोकून देऊन काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले. -------- घरकुल योजनेवर विशेष लक्ष प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल, रमाई घरकुल आणि मोदी आवास योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समन्वयातून घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत गाठण्यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. नियोजनबद्ध कामाद्वारे विहित कालावधीत लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना नमन गोयल यांनी यावेळी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT