NSK26H19177
जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वूमन डॉक्टर विंगतर्फे आयोजित पायलेट्स प्रात्यक्षिक कार्यशाळेत सहभागी महिला सदस्य. सोबत तज्ज्ञ मार्गदर्शक व क्लबचे पदाधिकारी.
-------
वूमन डॉक्टर विंगतर्फे पायलेट्स प्रात्यक्षिक
उपशीर्षक
जळगावातील कार्यशाळेत ‘फिटनेस’बद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वूमन डॉक्टर विंगतर्फे नुकतेच पायलेट्स प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. आदित्य खाचणे यांनी फिटनेसचे महत्त्व सांगत मानेपासून पायापर्यंतची व्यायाम करून घेत मार्गदर्शन केले. त्यांना डॉ. प्रीती खाचणे यांनी सहकार्य केले.
आयएमए जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले, सचिव डॉ. पंकज शाह, वूमन डॉक्टर विंगच्या अध्यक्ष डॉ. सुजाता महाजन, सचिव डॉ. रूपाली बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते.
यांनी घेतला सहभाग
कार्यशाळेत डॉ. रागिणी पाटील, डॉ. चंचल शाह, डॉ. मनजीत संघवी, डॉ. रेणुका चव्हाण, डॉ. योगिता हिवरकर, डॉ. दर्शना शाह, डॉ. जयश्री राणे, डॉ. गौरी सरोदे, डॉ. कीर्ती देशमुख, प्रा. डॉ. गौरी राणे, आर्किटेक्ट सुचिता कोल्हे, चारुलता ढेकाळे, संयोगिता पाटील, हर्षाली तायडे यांच्यासह अनेक महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.