नाशिक

‘नीट-यूजी’ रद्द प्रकरणी अभाविप शाखेची निदर्शने

CD
NSK26H19185 जळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्‍यक ‘नीट’ परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द केल्याच्या निषेधार्थ शहरातील काव्यरत्नावली चौकात निदर्शने करताना अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते. ----- ‘नीट-यूजी’ रद्द प्रकरणी अभाविपची निदर्शने उपशीर्षक काव्यरत्नावली चौकात आंदोलन; चौकशीसह कारवाईची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : नीट-यूजी २०२६ परीक्षेमध्ये समोर आलेल्या अनियमितता, पेपर लीक व परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेतर्फे शहरातील काव्यरत्नावली चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये ११ वी-१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, नीटचे परीक्षार्थी तसेच अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा’, एनटीए जवाब दो, पेपर माफियांवर कठोर कारवाई करा’ अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. अभाविपने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करीत या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. अभाविपने स्पष्ट केले, की २०२४ मध्ये अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतरही पुन्हा परीक्षा प्रक्रियेमध्ये अनियमितता होणे दुर्दैवी व निराशाजनक आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षेची तयारी करीत असताना अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. चौकट विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष : नन्नवरे या वेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी अभाविप प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्यायासाठी ठामपणे लढत राहील, असे सांगितले. महानगर मंत्री वरद पांढारकर यांनीही मनोगत व्यक्त करीत अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहील, असा इशारा दिला. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT