नाशिक

प्राध्यापिकेच्या संशोधनाला केंद्र सरकारचे पेटंट

CD
दोन कॉलमात घ्यावी ‘नूतन मराठा’तील प्राध्यापिकेच्या संशोधनाला केंद्र सरकारचे पेटंट उपशीर्षक रोपांच्या संवर्धनाचे प्रमाण वाढविणारे उत्पादन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : नूतन मराठा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. वर्षा अशोक भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या पोर्टेबल प्लँटलेट अ‍ॅक्लिमटायझेशन चेंबर या अभिनव डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत मंजुरी प्रदान केली आहे. डिझाइन अधिनियम २००० अंतर्गत या पेटंटची नोंदणी करण्यात आली आहे. वनस्पती ऊतकसंवर्धन (Plant Tissue Culture) प्रक्रियेत प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात तयार झालेली नाजूक रोपे जेव्हा थेट नैसर्गिक वातावरणात लावली जातात, तेव्हा तापमान आणि आर्द्रतेतील बदलामुळे ती मोठ्या प्रमाणात मरतात. ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. वर्षा भालेराव यांनी या विशेष चेंबरची निर्मिती केली आहे. हे चेंबर प्रयोगशाळेतून बाहेर काढताना रोपांवर येणारा ताण कमी करते, ज्यामुळे रोपांचा सर्व्हायव्हल रेट लक्षणीयरीत्या वाढतो. हे उपकरण कृषी संशोधन संस्था, व्यावसायिक नर्सरी आणि शैक्षणिक प्रयोगशाळांसाठी क्रांतीकारक ठरणार असून, यामुळे शाश्वत शेतीला बळ मिळणार आहे. या महत्त्वाच्या संशोधनात डॉ. वर्षा भालेराव यांच्यासोबत धाराशिव येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रीकांत भोसले, प्रा. अर्चना मुखेडकर आणि डॉ. शीला शिंदे यांचाही सहभाग आहे. या पेटंटमुळे आता संशोधकांना या डिझाइनवर कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण पी. देशमुख यांनी संशोधकांचे विशेष कौतुक केले. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT