नाशिक

रक्तदान ही मानवतेची खरी पूजा

CD
NSK26H19189 जळगाव : ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभागातर्फे आयोजित शिबिरात रक्‍तदान करताना तेजलदीदी व सहकारी. रक्तदान ही मानवतेची खरी पूजा उपशीर्षक  डॉ. किरण पाटील : ब्रह्माकुमारीज् वैद्यकीय प्रभागातर्फे रक्तदान शिबिर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान तर आहेच; पण आपली ही सामाजिक जबाबदारी असून, हीच खरी मानवतेची पूजा असल्याचे मत  ब्रह्माकुमारीज् वैद्यकीय प्रभागाचे जळगाव उपक्षेत्रीय समन्वयक डॉ. किरण पाटील यांनी व्‍यक्‍त केले.   ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी सेवा केंद्रात वैद्यकीय प्रभागातर्फे आयोजित आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र  संयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक धीरज सोनी, ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी, गायत्री कुळकर्णी उपस्थित होते. ब्रह्माकुमारीज स्थापनेच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त जळगाव सबझोनमध्ये नव्वद कार्यक्रम मालिकेंतर्गत आयोजित केला गेला. शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. शिबिरास  गोळवलकर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गायत्री कुळकर्णी, डॉ. मकरंद वैद्य, जागृती लोहार, जयवंत पाटील यांचे तर ब्रह्माकुमारीजचे राजश्री वाघोदे, राजूभाई यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT