फोटो : H19188
विकास लवांडे यांना अटक करा
विहिप, बजरंग दल, वारकरी संप्रदायाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या विकास लवांडे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाने केली. या संदर्भात शहरातील नऊ पोलीस ठाण्यांमध्ये एकावेळी निवेदन देण्यात आले.
लवांडे यांनी केलेल्या वक्तव्याचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाने निषेध नोंदविला आहे. धार्मिक व सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेत पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर, मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प या नऊ पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. ज्या भूमीतून वारकरी संप्रदायाचा जागर होतो, तेथे कीर्तनकारांना घुसखोर म्हणणाऱ्यांचा निषेधासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विकास लवांडे यांनी राजकीय स्वार्थापोटी वारकरी संप्रदायातील २० कीर्तनकारांना धर्मांध आणि घुसखोर म्हणून संबोधले आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजात वैमनस्य निर्माण होतानाच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भितीही व्यक्त केली. समाजाला दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या कीर्तनकारांचा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल लवांडे यांना अटक करावी. अन्यथा जिल्हाभरात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.