नाशिक

पाच धरणांतील २९ लाख लिटरचा व्यावसायिक वापर

CD
पाच धरणांतील २९ लाख लिटर पाण्याचा व्यावसायिक वापर जलसंपदा विभागाची इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर व नाशिक तालुक्यांतील रेसॉर्टला परवानगी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : धरणांचा तालुका, अशी ओळख असलेल्या इगतपुरी येथील भावली धरणासह त्र्यंबकेश्‍वरच्या गौतमी गोदावरी व गंगापूर अशा पाच धरणांतून आठ व्यावसायिकांना २९ लाख लिटर पाणी व्यावसायिक वापरासाठी देण्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागातर्फे व्यावसायिक पाणी वापरासाठी अधिकृत परवानगी दिली जाते. या विभागाने १२ मे २०२६ मध्ये आठ शासन निर्णय प्रसिद्ध करत व्यावसायिकांना पाणी वापरासाठी परवानगी दिली आहे. यात भावली धरणातून सर्वाधिक चार व्यावसायिकांना पाणी मिळणार आहे. महेश्‍वर इस्टेट्स एलएलपी जामुंडा यांना सहा कोटी दहा लाख ४२ हजार लिटर, जामुंडा हिल्स्‌ इस्टेट्स, जामुंडा यांना चार कोटी २७ लाख ७४ हजार लिटर, द ग्रॅन्ड गार्डन रिसॉर्ट ॲन्ड स्पा-पिंप्रिसदोद्दिन यांना ३१ लाख ९२ हजार लिटर व फॉरेस्ट फार्म नर्सरी, तारांगणपाडा यांना २९ लाख ३६ हजार लिटरची परवानगी देण्यात आली. तसेच चेहेडी खु. (ता. निफाड) येथील गो ग्रीन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांना चार कोटी ४९ लाख ९३ हजार लिटर पाणी देण्यात येईल. वाकी प्रकल्प समूहातून निशांत इन्फ्राडवेल प्रा. लि. भावली बु. (ता. इगतपुरी) यांना ३८ लाख २७ हजार लिटर, गौतमी गोदावरी अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्‍वर) रिसोर्ट व हॉलिडे होमला दोन कोटी २३ लाख ८६ हजार लिटर पाणी मिळेल आणि गंगापूर धरणातून पिंपळगाव गरुडेश्‍वर येथील श्‍वेता इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड हाऊसिंग इंडिया प्रा. लि. यांना दहा कोटी १९ लाख चार हजार लिटर पाणी देण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही धरणांनी यंदा तळ गाठला आहे. --- भावली धरण (ता. इगतपुरी) - महेश्‍वर इस्टेट्स एलएलपी जामुंडा - सहा कोटी दहा लाख ४२ हजार लिटर - जामुंडा हिल्स्‌ इस्टेट्स, जामुंडा - चार कोटी २७ लाख ७४ हजार लिटर - द ग्रॅन्ड गार्डन रिसॉर्ट ॲन्ड स्पा-पिंप्रिसदोद्दिन - ३१ लाख ९२ हजार लिटर - फॉरेस्ट फार्म नर्सरी, तारांगणपाडा - २९ लाख ३६ हजार लिटर … वालदेवी बु.ल.पा. प्रकल्पातून गो ग्रीन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चेहेडी खु. (ता. निफाड) - चार कोटी ४९ लाख ९३ हजार लिटर … वाकी प्रकल्प समूहातून निशांत इन्फ्राडवेल प्रा. लि. भावली बु. (ता. इगतपुरी) - ३८ लाख २७ हजार लिटर … गौतमी गोदावरी अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्‍वर) - रिसोर्ट व हॉलिडे होम - दोन कोटी २३ लाख ८६ हजार लिटर … गंगापूर धरण श्‍वेता इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड हाऊसिंग इंडिया प्रा. लि. - पिंपळगाव गरुडेश्‍वर (जि. नाशिक) - दहा कोटी १९ लाख चार हजार लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT